चक्क पर्यटकांसमोर वाघाने वनमजुराला नेले ओढत! #Chandrapur #tiger #tigerattack

चंद्रपूर:- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निमढेला बफर क्षेत्रातील स्वच्छता कर्मचाऱ्यावर वर वाघाने हल्ला करून ठार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली. राम रामचंद्र हनवते (५४) असे मृतकाचे नाव आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून राम रामचंद्र हनवते हे रोजंदारी स्वच्छता कर्मचारी म्हणून कर्तव्य बजावत होते. त्यांचा मुलगा रंजीत हनवते हा येथे मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे. खडसंगी वनपरिक्षेत्रातील निमढेला नियतक्षेत्रात आपले काम आटोपून तो जात असताना निमढेला गेट समोरील कक्ष क्रमांक ५८ मध्ये अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. घटनास्थळ परिसरात उपस्थित पर्यटकांसमोरच वाघाने त्यांना फरफटत जंगलात नेतांना काहींनी बघितले. वनविभागाची जिप्सी येतांना बघून त्याला टाकून वाघ जंगलात पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल आले. घटनेचा पंचनामा केला गेला. यावेळी मृतकाचे नातेवाईकांना तातडीची १ लाख रुपये रोख व ९ लाख रुपयांचा धनादेश अशी मदत करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने