चंद्रपूर:- दरवर्षी प्रमाणे २३ जानेवारी ला हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन युवासेना च्या माध्यमातून करण्यात आले. चंद्रपूर येथील इंदिरा नगर या दुर्गम भागातील इंदिरा नगर माध्यमिक शाळा येथे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले त्यावेळी विविध स्पर्धेकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
या स्पर्धेचे आयोजन सिनेट सदस्य तसेच युवासेना सचिव प्रा. निलेश बेलखेडे यांनी केले.संमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून संस्थेच्या सचिव सौ ममताजी बजाज मॅडम,मुख्याध्यापिका साखरकर मॅडम विशेष अतिथी म्हणून रामनगर पोलीस स्टेशन चे उपनिरिक्षक जाधव सर, सिनेट सदस्य प्रा निलेश बेलखेडे सर, युवासेना उपशहर प्रमुख सार्थक शिर्के यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रा निलेश बेलखेडे यांनी मराठी शाळा आजहि उत्कृष्ट कार्य करीत असून काॅंन्वेट संस्कृती मुळे विद्यार्थ्यांचा कल तिकडे वाढत असला तरी ग्रामिण भागातील पालकांनी, विद्यार्थानी स्वतः ला कुठे हि कमी न समजता मेहनत करून मोठ्या पदावर जाण्यासाठी प्रयत्न करावे तसेच विविध स्पर्धेचे च्या माध्यमातून चांगल्या गोष्टी आत्मसात करून माणुसकीचे धडे आपल्या आचरणात आणावे असा संदेश दिला व आपण सदैव यापुढे हि गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या सहकार्यासाठी तयार राहू अशी ग्वाही दिली.यावेळी संस्थेच्या सचिव बजाज मॅडम यांनी सुद्धा विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन केले. इतर मान्यवरांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
शाळेच्या वार्षिक संमेलनामध्ये विविध खेळ स्पर्धा, नाटक, सांस्कृतिक नृत्य स्पर्धा तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त यावेळी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व दरवर्षी प्रमाणे मागील परीक्षेमध्ये विविध वर्गातील प्रथम उतीर्ण विद्यार्थ्यांना बाळासाहेब ठाकरे स्काॅलरशीप सुद्धा देण्यात आली करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी सुंदर सांस्कृतिक नृत्य, समाजातील बालविवाह पद्धतीवर नाटके सादर करीत उत्कृष्ट सादरीकरण केले यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, पालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन मनिष वांढरे सर यांनी केले व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.