जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल प्रथम #chandrapur #ballarpur #pombhurna

Bhairav Diwase

बल्लारपूर:- बल्लारपूर येथे झालेल्या 51 वा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल पोंभुर्णा यांनी आदिवासी प्राथमिकगट मधून प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये धनश्री उमेश पीदुरकर आणि समीक्षा प्रशांत कात्रोजवार त्यांनी सहभाग घेतला होता.

या 51 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये तालुकास्तरावर जिंकलेल्या शाळांनी सहभाग घेतला होता आणि एकूण 116 प्रतिकृती प्रदर्शनीमध्ये सहभागी झाल्या होत्या.

या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार पालकमंत्री चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले तर बक्षीस वितरण कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी प्राथमिक चंद्रपूर आणि प्राचार्या दिलासाग्राम कॉन्व्हेंट स्कूल बल्लारपूर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे संचालक प्रा. संदीप ढोबळे, प्राचार्या रिजवाना शेख, उपप्राचार्य राजीव खोब्रागडे, साहिल येल्लेटीवार, पलक काळे, नितेश भंडारी, स्नेहा उराडे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.