बकऱ्या चरायला गेलेल्या युवकावर बिबट्याचा हल्ला #chandrapur #Mul


मुल:- तालुक्याच्या ठिकाणापासून पासून 5 की.मी. अंतरावरील नागपूर मार्गावर असलेल्या मरेगांव येथिल शेतात शिवारात बकऱ्या चारायला गेलेल्या युवकावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना मूल तालुक्यातील मरेगांव येथे घडली. नाव आशिष राजु दुधकोवर (वय १७ ) असे जखमी युवकाचे नांव आहे.

घटनेचे सविस्तर वृत्त असे मूल तालुक्यातील सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मरेगांव येथील आशिष राजु दुधकोवर हा युवक औद्योगिक विकास महामंडळातील ,(एम.आय.डी.सी.) परिसरातील पृथ्वी कंपनीच्या जवळील विश्वेश्वर कोंडु पेंदोर यांच्या शेतात बकऱ्या चारत असताना झुडपामधे दबा धरून बसलेल्या बिबट्याने युवकावर हल्ला करून जखमी केला. आशिष या घटनेमुळे भयभीत होऊन जोराने ओरडल्याने बिबट घटनास्थळावरून पळून गेला. आशिष गंभीर जखमी झाला आहे. त्याला लगेच मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

घटनास्थळावर सावली वनपरिक्षेत्र कार्यायलाचे वनपरिक्षेत्राधिकारी वैभव राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक धनविजय यांनी पंचनामा केला आहे. वनविभागाने जखमीला आर्थिक मदत करावी अशी मागणी युवकाच्या कुटुंबीयांनी वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग सावली यांचेकडे केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने