एका आठवड्यात चार हत्येने चंद्रपूर जिल्हा हादरला #Chandrapur #murder,


ब्रम्हपुरी, गोंडपिपरी, बल्लारपूर नंतर चंद्रपूरात हत्या


चंद्रपूर:- मागील आठवडाभरापासून चंद्रपूर जिल्ह्यात हत्येचे सत्र सुरू आहे. ब्रम्हपुरी, गोंडपिपरी, बल्लारपूर नंतर चंद्रपुर शहरात हत्या झाल्याच्या घटनेनं अख्य चंद्रपूर जिल्हा हादरला आहे.


ब्रम्हपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथे पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना दि. 12 फेब्रुवारी ला सकाळी उघडकीस आली. हिरकण्या जयदेव पिल्लेवान असे मृतक महिलेचे नाव आहे. 12 फेब्रुवारीला सकाळी 7.00 वाजता जॅकीस ला त्याची आई हिरकण्या जयदेव पिल्लेवान (50) ही मृतावस्थेत पडलेली दिसली. आईला वडिलांनी हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याने डोक्याला व चेहऱ्याला मार लागल्याने ती मरण पावली अशी माहिती पोलीस ठाण्यात दिली.


गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही मुले गावातील शेतकऱ्यांकडे मजुरीसाठी कापसाची गाडी भरायला गेली असता झोपेत असलेल्या वेडगाव येथील लता दामोदर धुडसे (वय 40 वर्ष) यांच्यावर पतीनेच वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना दि. 15 फेब्रुवारीला मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घडली.


चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सिनूच्या घरीच रक्ताच्या थारोळ्यात युवतीचा मृतदेह आढळला होता. महाराणा प्रताप वार्डातील सम्यक चौकातील घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. हि घटना शुक्रवारी 16 फेब्रुवारीला घडली. मृतक तरुणीचे नाव रक्षा कुमरे (22) रा. महाराणा प्रताप वार्ड, सम्यक चौक बल्लारपूर असे आहे. तर सिनू दहागावकर (29) असे आरोपीचे नाव असून, तो घटनेनंतर फरार झाल्याची माहिती आहे.


चंद्रपुर शहरात युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अष्टभुजा वार्ड निवासी सुरजसिंह कुंवर (वय 25) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी 5 आरोपीना अटक केली असून यामध्ये अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. सुरजसिंह कुंवर व आरोपी हे एकमेकांचे मित्र होते. शुक्रवारी दि. 16 फेब्रुवारी रात्री मृत सुरजसिंह कुंवर हा मित्रांसोबत दारूची पार्टी करीत होता. दरम्यान आपसात त्यांच्यामध्ये भांडण झाले. भांडणाचे रूपांतर मारहाणीत झाले. त्यांनतर आरोपीनी धारधार शस्त्राने सूरजची हत्या केली.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने