Top News

दहावीच्या विद्यार्थिनीवर जंगलात नेऊन बलात्कार #chandrapur #nagpur #rape

नागपूर:- ज्या स्कूलबसमधून मुलगी (Girl) शाळेत (School) जात होती, त्याच स्कूलबसवरील चालकाचा मित्र (Friend) असलेल्या युवकाने दहाविच्या विद्यार्थिनीला (10th class Student) प्रेमाच्या जाळ्यात (love) ओढले. तिला रात्रीच्या सुमारास जंगलात (forest) नेऊन बलात्कार केला.


या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी (Watoda police) गुन्हा (Crime) दाखल केला. श्याम उर्फ बिट्टू प्रशांत बेलखोडे (२४) रा. जलारामनगर, खरबी रोड, असे अटकेतील (Arrested) आरोपीचे (accused ) नाव आहे.


पीडित १५ वर्षीय मुलगी ही दहावीची विद्यार्थिनी आहे. बिट्टू हा ड्रायव्हरचे काम करतो. बिट्टूचा एक मित्र स्कूल बस चालवतो. त्याच्या बसमधून पीडित मुलगी शाळेत येणे-जाणे करीत होती. बिट्टू हा नेहमी स्कूलबसवर मित्रासोबत येत होता. या दरम्यान तिची बिट्टूशी ओळख झाली. बिट्टू नेहमी तिच्याशी गोड-गोड बोलत होता. दरम्यान, तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. १९ जानेवारीला बिट्टूने मुलीला पाणीपुरी खाण्यासाठी हसनबाग परिसरात बोलावले.


हेही वाचा:- आईच्या प्रियकराची मुलाने केली धुलाई


रात्री ८ वाजताच्या सुमारास ती त्याला भेटण्यासाठी हसनबाग परिसरात गेली. तेथून बिट्टू तिला दुचाकीवर बसवून वाठोडा कुलर कंपनीजवळील जंगलात निर्जनस्थळावर घेऊन गेला. तेथे त्याने तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवले. याबाबत वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरामुळे मुलगी घाबरलेली होती. तिचा स्वभाव बदलला होता. ती कोणाशीच बोलत नव्हती. मुलीची ही अवस्था पाहून आईने तिला विश्वासात घेत विचारपूस केली. तिने बिट्टूने जबरीने लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. वाठोडा पोलिसात घटनेची तक्रार करण्यात आली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून बिट्टूला अटक केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने