अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळालं
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाचा (ECI) निर्णय झाला आहे. या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष हे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांना मिळाले आहे.
आयोगाच्या निर्णय म्हणजे 85 वर्षांच्या शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
तसेच, हा गट 7 फेब्रुवारी दुपारी 4 वाजेपर्यंत स्वतंत्र पक्षासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी करु शकतो. जर ही मागणी झाली नाही तर त्या गटाला अपक्ष मानले जाईल, असेही आयोगाने म्हटले आहे.