Click Here...👇👇👇

देवाई येथील युवकांचा शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
1 minute read
पोंभूर्णा:- तालुक्यातील देवई येथील युवकांचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी भगवा दुप्पटा घालून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल करून घेतला. हा कार्यक्रम देवई येथील क्रांतीवीर बिरसा मुंडा चौकात संपन्न झाला.

पक्षप्रवेश सोहळ्याच्या मार्गदर्शन करताना संदिप गिऱ्हे म्हणाले की, आपण शिवसेना पक्षातील कुटुंबाचे सदस्य झालात याचा मला मनापासून आनंद वाटतो म्हणून सर्वांचे मनापासून अभिनंदन व स्वागत करतो. आपण सर्वांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना 80% समाजकारण व 20% राजकारण हा महामंत्र ध्यानी घेऊन गोरगरीब मायबाप जनतेची सेवा करावी नूतन राशन कार्ड गरजूंच्या स्वस्त धान्य पुरवण, औषधोपचार, विधवा घटस्फोटीत अपंग श्रावणबाळ निराधार योजनेत पात्र लाभार्थ्यांना मदत करा त्यांचे प्रकरणे दाखल करा, मतदार नोंदणी करून घ्यावी, जनता जनार्दन च्या समस्या सोडविण्यासाठी तथा त्यांच्या सुखात दु:खात सहभागी व्हा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. शिवसेना पक्ष तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहे व्यसनापासून दूर राहा निरोगी व आनंदी जीवन जगा आपल्या हातून समाजाची सेवा घडावी.

पक्षप्रवेश तालुका प्रमुख आशिष कावटवार यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. यावेळी पोंभुर्णा युवासेना शहर प्रमुख महेश श्रीगिरीवार, मनीष कोपावार, साहिल नैताम उपस्थित होते. प्रवेश करणारे देवई येथे नेहमी सामाजिक कार्यात सहभागी होत वेळोवेळी मदतीला धावून जाणारे पिंटू इष्टम यांच्या सोबत बादल मडावी, सत्यपाल मेश्राम,आदित्य मडावी, राहुल कोवे, पवन मडावी, राकेश इष्टम, विशाल मडावी, साहिल आलम, माणिक शेडमाके, जयंत कोवे, विवेक मडावी, अखिल आत्राम, उज्वल आत्राम, मारोती मडावी, मनोहर कन्नाके, आदित्य आत्राम, महेश कोवे,नितेश वेलादी, प्रजोत कोवे, नयन आलम, साहिल आत्राम, रितिक मडावी, मनाथन नेवरे, पिंटू इष्टाम, बादल मडावी, सत्यपाल व आदी मोठ्या संख्येने पक्षप्रवेश घेतला.यावेळी कार्यक्रमाला युवकांची लक्षणीय उपस्थिती होती.