Top News

चंद्रपुरात क्षुल्लक कारणावरून चाकूने हल्ला #chandrapur

चंद्रपूर:- अश्लील शिवीगाळ केल्याचा ठपका ठेवत दुर्गापूर येथील वॉर्ड क्रमांक ३ मधील दोन जणांमध्ये भांडण झाले. यात एकाने चाकूने तर दुसऱ्याने लाथाबुक्क्याने एकमेकांना मारहाण केली. ही घटना १४ फेब्रुवारीला घडली. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी दोघांवरही गुन्हे दाखल केले आहेत.

दुर्गापूर वॉर्ड क्रमांक ३ येथील भररस्त्यावर दोन इसमांत सुलेमान शेख व सूर्यभान धोत्रे या दोघांचे शाब्दिक भांडण झाले, वाद विकोपाला जाऊन दोघांत हातापायी झाली. यापैकी सुलेमान शेख याने सूर्यभान धोत्रे याला कानाच्या मागच्या बाजूला चाकूने वार करून जखमी केले. याबाबत दुर्गापूर पोलिस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रारी देण्यात आल्या. दुर्गापूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शेख यांच्यावर कलम ३२४ अन्वये तर धोत्रे याच्यावर कलम २९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने