०१ देशी कट्टा व ०२ जीवंत काडतुस जप्त #chandrapur #Lcbchandrapur


स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

चंद्रपूर:- चंद्रपुर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अवैध धंदे, अवैध हत्यार बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश मुमक्का सुदर्शन पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांनी दिले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध रित्या हत्यार बाळगणाऱ्यांवर माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याची मोहीम राबवित होते.

सदर मोहिमेदरम्यान पथकाला गोपनिय माहिती मिळाली की, मौजा पडोली येथील डी. एन. आर. ऑफीसचे मागे रेल्वे लाईनजवळ एक इसम आपले कमरेला गावठी देशी कट्टा लावून उभा आहे. सदर माहितीवरून पोउपनि. भुरले त्यांच्या टिमसह तात्काळ रवाना होवून सदर इसमास ताब्यात घेवून त्याची तपासणी केली असता, सदर इसमाच्या कमरेला लागून असलेला एक देशी कट्टा तसेच त्याच्या पँटच्या खिशात देशी कट्यात वापरण्यात येणारे ०२ नग जीवंत काडतुस मिळून आले. नौशाद शहादतुल्ला कुरेशी (३२) असे आरोपीचे नाव आहे. तो प्रभाग क्र. 2, बँक ऑफ इंडियाच्या मागे, घुघुस, ता. जिल्हा. चंद्रपूर येथील राहणारा आहे.


सदर इसमाचे नाव विचारून त्याचा क्राईम रेकॉर्ड तपासला असता त्याचेवर पोस्टे घुग्घूस, पोस्टे राजुरा, पोस्टे वरोरा येथे अनेक चोरी, जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. तसेच सदरचा इसम हा चोरी, घरफोडी तसेच इतर गुन्ह्यांमध्ये विविध पोलीस स्टेशनमध्ये फरार आहे.

सदर इसमाविरूद्ध पोस्टे पडोली येथे अवैधरित्या शस्त्र बाळगणेबाबत गुन्हा नोंद केला असून सदर इसमास पुढिल तपासकामी पोस्टे पडोली यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि बोबडे, सपोनि नागेशकुमार चतरकर, सपोनि किशोर शेरकी, पोउपनि विनोद भुरले, पोहवा संजय आतकुलवार नापोकॉ. संतोष येलपुलवार, पोकॉ गोपाल आतकुलवार, पोकॉ नितीन रायपुरे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या