Top News

Viral Video: ताडोबा जंगलात वाघोबाची स्वच्छता मोहीम! #Chandrapur #Tadobaandhari #TATR



चंद्रपूर:- चंद्रपूर येथील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघ पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. मात्र, हे पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असल्याने याचा फटका येथील वन्यजीवांना बसत आहे.

याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका वन्य जीव छायाचित्रकाराने हा व्हिडिओ काढला आहे. ताडोबा अभयारण्यातील एक वाघ पाणवठ्यात पडलेली एक प्लॅस्टिकची बॉटल तोंडात धरून ती घेऊन जात असतांनाचा हा व्हिडिओ आहे. दरम्यान, या व्हायरल व्हिडिओवरुन तरी येथे येणारे पर्यटक धडा घेणार हा प्रश्न आहे.

Viral video📹📹

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा नॅशनल पार्क वाघांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक वाघ पाण्यासाठी येत असतात. येथील जंगलसफारीचा आनंद घेत असतांना पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात. हा कचरा येथील प्राण्यांसाठी जीवघेणा ठारत आहे. या ठिकाणी अनेक नियम असूनही हे नियम धाब्यावर बसवून या जंगळाचे प्रदूषण केले जात आहे.

एकीकडे मानवाला विवेकशील म्हंटले जाते. बेजबादारपणे वागून मानव आपल्या पर्यावरनाला धोका निर्माण करत असतांना मात्र, या जंगलातील वन्यप्राणी मात्र, जंगलाच्या स्वच्छतेसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. या जंगलात एका पानवठ्यात पडलेली एक बॉटल बाहेर काढून त्याची स्वच्छता करत असतांनाचा एका वाघाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वन्यजीव छायाचित्रकार दीप काठीकर यांनी हा व्हिडिओ शूट केला असून या व्हिडिओमध्ये वाघ तोंडात बाटली धरून निघून जात असल्याचे दिसत आहे. जणू हा वाघ आपल्या जंगलाचे आणि पर्यावरणाचा रक्षक आहे असेच या व्हिडिओतून दिसत आहे. मात्र, बुद्धिजीवी असलेल्या मानव प्राण्याला मात्र, कधी आपल्या पर्यावरणाबद्दल जाणीव होईल हा प्रश्न हा व्हिडिओ पाहून पडत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने