Top News

ब्रम्हपुरी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिट, शेती पिकांचे मोठे नुकसान #Chandrapur #Brahmapuri

तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

ब्रम्हपुरी:- तालुक्यातील विविध भागांत १९ मार्चला रात्रौ आलेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेत शिवारात अनेक झाडे कोलमडली आहेत. अस्मानी संकटामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडलेला आहे.
काल मंगळवारला सायंकाळ पासूनच ब्रम्हपुरी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वादळवारा सुरु झाला. रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसासह गारपिट झाली.

जवळपास अर्धा तास झालेल्या गारपिटीमुळे विविध भागांतील फळपीक, भाजीपाला पीक आणि रब्बी हंगामातील विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यातील खरकाडा, नीलज,रुई ,पाचगाव,गांगलवाडी, बरडकिन्ही, चीचगाव, मांगली आवळगाव, हळदा, बोडधा, मुडझा, मेंडकी, वांद्रा परीसरात अवकाळी पावसासह आलेल्या गारपिटीचा फटका बसला असून तूर, भात,चना, गहू रब्बी पिकांचे व कारली, टमाटर कांदा वांगा भेंडी,मिरची भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारांमुळे उभे असलेले पीक जमीनदोस्त झाले आहे.
भाजीपाला पिके रब्बी पिके उद्वस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा सर्वे करून आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने