Top News

काँग्रेसचा उमेदवार ठरेना, पण अंतर्गत धुसफूस बाहेर #chandrapur #chandrapurloksabha

चंद्रपूर:- महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार, जाहीर सभा, जनसंपर्क सुरू झालेला आहे. महाविकास आघाडीत चंद्रपूरची जागा काँग्रेस पक्षाला सुटली आहे. मात्र, काँग्रेसच्या उमेदवारीचा गोंधळ दिल्ली-मुंबई असा सुरू आहे.

काँग्रेसच्या केंद्रीय समितीने विजय वडेट्टीवार आणि आमदार प्रतिभा धानोरकर या दोघांपैकी एकाला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही विजय वडेट्टीवार लोकसभा लढण्यास तयार नसतील तर मग प्रतिभा धानोरकर यांना संधी द्या, असे स्पष्ट केले आहे.

काँग्रेसचा उमेदवारीचा घोळ सुरू असताना कुणबी समाजाच्यावतीने विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात 'चुकीला माफी नाही' म्हणून एक पत्रक समाज माध्यमावर व्हायरल केले आहे, तर तेली समाजानेदेखील काँग्रेसने चंद्रपुरातून उमेदवारी दिली नाही तर वेगळी आणि ठोस भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. प्रतिभा धानोरकर यांच्या बंगल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी न दिल्यास राजीनामा सत्र सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

व्हायरल पत्रात काय?

समाज माध्यमात दोन पत्रक व्हायरल होत ज्यात पहिल्या पत्रात वडेट्टीवार यांच समर्थन करण्यात येत आहे तर दुसऱ्या पत्रात विरोध...

Source:- What'sup (समाज माध्यमात पत्रक व्हायरल)

वाचा आणि एकदा अवश्य विचार करा

• सुधाकर अडबाले यांच्यासाठी स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावून काँग्रेस पक्षातील वरिष्ठांशी पंगा घेत उमेदवारी मिळवून देणारा कोण?

• स्व. बाळू धानोरकर यांना तिकीट मिळवून देण्यापासून ते जिंकून आणेपर्यंत रात्रंदिवस जागणारा माणूस कोण?

• स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता स्व. बाळू धानोरकर यांना निवडून आणेपर्यंत जीवाची बाजी लावणारा कोण?

• स्व. बाळू धानोरकरांसाठी उमेदवारी मिळावी यासाठी दिल्लीत दहा दिवस पक्ष श्रेष्ठींसमोर तळ ठोकणारा कोण?

• सुभाष धोटेंची उमेदवारी धोक्यात असताना अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी भांडून उमेदवारी मिळवून देणारा कोण?

• समाजासाठी कधीही, कुठलेही चुकीचे काम वडेट्टीवारांनी केले नाही. मात्र काही लोक द्वेष, विष कालवण्याचे काम करत असून समाजात दुफळी निर्माण करण्याचे पाप करत आहे.

• चंद्रकांत हांडोरे यांच्या विधानपरिषद निवडणुकीत विदर्भातील मते फुटली होती. ते गद्दार कोण. त्यामुळे निष्ठा आणि प्रामाणिकपणा कोणाचा याचाही जनतेने जरूर विचार करावा.

समाजाला न्याय मिळवून देणारा, समाजासाठी लढणाऱ्या नेत्यांच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.


Source:- What'sup (समाज माध्यमात पत्रक व्हायरल)

तर दुसऱ्या व्हायरल पत्रात विजय वडेट्टीवार कुणबी समाजाच्या मतांवर ब्रह्मपुरी तालुक्यातच नाही तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात राजकारण करत आहेत. विदर्भातील कुणबी समाज त्यांच्या मागे उभा राहिला. केवळ राजकारण आणि चळवळीतच नाही तर नेहमीच कुणबी समाजाने वडेट्टीवार यांना पाठिंबा दिला आहे. पण गेल्या काही महिन्यात याच कुणबी समाजातील एका विधवा महिला लोकप्रतिनिधीच्या हक्काच्या जागेवर वडेट्टीवार राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वसामान्यांना राजकारण कळत नसेल पण निती नियम कळतात. राजकारणातील डावपेच समजत नसतील मात्र, नियत कळते, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. शिवाय, हक्काच्या जागेवर पोळी भाजली तर चुकीला माफी नाही, असा इशाराच या पत्रातून विजय वडेट्टीवार यांना देण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने