Top News

सकल हिंदू समाजाने मतदान करावे:- डॉ प्रवीण तोगडिया #Chandrapur

चंद्रपूर:- निवडणुकीमध्ये कोणाला काय फायदा होईल हे येणारा काळच ठरवेल. मात्र भारतातील सकल हिंदूंनी मतदान करावे असे आवाहन डॉ प्रवीण तोगडिया यांनी केले.
अभिषेक किशोर भागडे यांच्या निवासस्थानी ते आले होते. चंद्रपूर येथे आयोजित वीर हिंदू विजेता हिंदू या संमेलनाकरिता जात असताना ते चहापाण्याकरिता अभिषेक भागडे यांचे निवासस्थानी थांबले यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री ना नितीन गडकरी यांनी संपूर्ण भारतामध्ये रस्त्याचे जाळे विणले. आता त्यांनी लाहोर रावळपिंडीपर्यंत रस्ते तयार करावे याचा मनोमन आनंद होईल असेही ते म्हणाले.

याप्रसंगी आकांक्षा अभिषेक भागडे, शारदा हरिचंद काळे, विजया अलोने तसेच शिवाजी वार्ड, अभ्यंकर वार्ड मधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. अभिषेक किशोर भागडे यांचे काका राकेश भागडे, पत्नी सौ अलका राकेश भागडे, स्वरूप भागडे, अथर्व भागडे, ऍड सौरव भागडे, अर्पित भागडे, लटारी पिंगे, नरेश लाकडे, भारत कामडी, सुनील गाताडे, पुरुषोत्तम गाताडे, आशिष कोंकांडे अंकीत जोगी, गौरव बारापात्रे आणि भागडे परिवारातील सदस्य व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. तोगडिया यांची भागडे यांच्या निवासस्थानी भेट हे त्यांच्या कार्याची पावती आहे असे तोगडिया यावेळी म्हणाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने