Top News

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक #ED #Arvindkejariwal


नवी दिल्ली:- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. आज संध्याकाळी ईडीचे (ED) अधिकारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( CM Arvind Kejriwal) यांच्या घरी दाखल झाले.
त्यानंतर तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. ईडीच्या सात ते आठ अधिकाऱ्यांच्या पथकाने अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी धडक मारली. दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळल्यानंतर ईडीचे अधिकारी केजरीवाल यांच्या घरी दाखल झाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्लीतील मद्यविक्री घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडे दिलासा मागितला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्यास न्यायालयाने सध्या नकार दिला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने