Top News

कोल्हापूर येथे हँडबॉल राज्यस्तरीय स्पर्धेकरिता अमन करमनकर यांची निवड.




राजुरा:- महाराष्ट्र राज्य हँडबॉल संघटनेद्वारा आयोजित ४९ वी महाराष्ट्र वरिष्ठ गट पुरुष अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा २०२४ चे आयोजन कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र हायस्कूल आणि कनिष्ठ विद्यालय गाँधी मैदान शिवाजी पेठ कोल्हापूर येथे २३ ते २५ मार्च २०२४ रोजी करण्यात आले आहे.

अमन करमनकर यांच्या बद्दल थोडक्यात माहिती हा खेळाडू मु बामणवाडा,राजुरा- चंद्रपूर इथे राहत असून सामजिक,क्रीडा,आरोग्य,तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतो गोरगरिबांना मदत असो किंवा बाकी इतर आणि आपलं कुटुंब व आपलं शिक्षण बघून जीवन सुखरूप व आनंदमयी करतो, भविष्यात येणाऱ्या युवकांचे देखील प्रेरणास्थान आहे असं म्हणायला काही हरकत नाही, मुलांनो व्यसन नका करू हा देखील सल्ला वेळोवेळी सल्ला प्रसार माध्यमातून अमन करमनकर देत असतात. मुलांनो अभ्यास करा, यशस्वी व्हा आणि आई वडिलांचे स्वप्न साकार करा. या स्पर्धेत राज्यभरातील प्रत्येक जिल्हा संघ सहभागी होणार आहे. चंद्रपूर जिल्हा हँडबॉल संघटनेतर्फे सदर स्पर्धेकरिता जिल्हातील उत्तम खेळाडू निवड चाचणीतून राज्यस्तरीय स्पर्धेकरिता खेळाडूंची निवड करण्यात आली. 

सदर खेळाडू कोल्हापूर महाराष्ट्र हायस्कूल आणि कनिष्ठ विद्यालय गाँधी मैदान शिवाजी पेठ कोल्हापूर  येथे चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व करणार असून राज्यस्तरीय हँडबॉल अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेकरिता चंद्रपूर जिल्हा हँडबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री.अनिल धानोरकर, सचिव श्री. प्रकाश तुमाने,प्रा. विकी पेटकर, प्रा.पूर्वा खेरकर,प्रा. संगीता बांबोडे,वर्षा कोयचाडे, , सौ.भारती ताई पाल (सरपंच बामणवाडा), श्री. आनंद नगराळे (पोलिस पाटील बामणवाडा), बाळू भाऊ वडस्कर (सरपंच चुनाळा), तसेच बामणवाडा व चुनाळा ग्रामस्थांनी आणि मित्र परिवार यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही - अमन करमनकर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने