मागील कित्येक दिवसापासून खांबळा व विरुर नाल्यातून अवैद्य रेतीचा उपसा सुरू आहे त्यामुळे परिणामतः पाण्याची पातळी खाली गेली असल्याने परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे तसेच घरकुल बांधकाम साठी या अवैद्य उत्खननामुळे रेतीचा तुटवडा पडत असल्याने येथील नागरिक संतप्त दिसून येत आहे
मागील आठवड्यात राजुरा महसूल विभागाच्या गस्त दरम्यान पहाटेच्या सुमारास टाकलेल्या धाडीत एम एच 34 -3224 राजू इंग्रपवार रा. इंदिरानगर विरुर स्टेशन यांच्या मालकीचे ट्रॅक्टर व एम एच 34 AP 3360 लखनसिंग टाक रा. इंदिरानगर विरूर स्टेशन यांच्या ट्रॅक्टर वर अवैद्य रेती वाहूतुक करीत असताना दंडात्मक कार्यवाही करीत विरुर पोलीस स्टेशनमध्ये मुद्देमालसह जप्त करण्यात आली सदर कार्यवाही ही ओमप्रकाश तहसीलदार राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष साळवे मंडल अधिकारी विरुर, निरंजन गोरे मंडळ अधिकारी राजुरा व डी एम शेंडे तलाठी साझा विरुर स्टेशन यांनी केली.