तिकिटासाठी "तारीख पे तारीख"; चंद्रपूरात भाजपचं ठरलं, मात्र काँग्रेसचा उमेदवार ठरेना #chandrapurloksabha #chandrapur

चंद्रपूर:- लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले असताना चंद्रपूर लोकसभा उमेदवार घोषित करण्यात आला. मात्र काँग्रेसमध्ये 'तारीख पे तारीख'चा खेळ सुरू आहे. काँग्रेसने तर चंद्रपूर लोकसभा उमेदवारही जाहीर केलेला नाही, परंतु चंद्रपुर लोकसभेची (Chandrapur Lok Sabha) जागा जिंकण्यासाठी भाजपने आपल्याकडचा हुकमी एक्का अर्थात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar) यांना मैदानात उतरवलं आहे.

काँग्रेस पक्षासाठी नेहमीच अडचणीचा विषय ठरलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार की आमदार प्रतिभा धानोरकर ही स्थिती 'जैसे थे' असल्याने महाविकास आघाडीत सहभागी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. पक्षश्रेष्ठींनी उमेदवार लवकर जाहीर करावा अशी मागणी होत आहे.

चंद्रपूर लोकसभेची जागा राखून भाजपला (BJP) शह देण्याऐवजी काँग्रेसमधील इच्छुक आपापसात भांडताना दिसत आहेत. चंद्रपूरचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आ. प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्यातच उमेदवारीचा संघर्ष पेटला असून, ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोघात घमासान सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या