Naxal Encounter: सुरक्षा दल व नक्षलवाद्यांच्या चकमकीत ६ माओवादी ठार #chattisgarh

Bhairav Diwase

छत्तीसगड:- लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षादलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली असून या चकमकीत जवानांनी केलेल्या गोळीबारात ६ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे.


छत्तीसगडमधील बिजापूर येथील बासागुडा पोलीस स्टेशन परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली आहे. कोब्रा २१०, २०५, सीआरपीएफची २२९ वी बटालियन आणि डीआरजी यांचा समावेश असलेल्या सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. जवानांनी जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांना घेरुन जोरदार गोळीबार केला. जवानांनी केलेल्या गोळीबारात ६ नक्षलवादी ठार झाले.