मनसे नेते राजु उंबरकर यांची मुनगंटीवार यांनी घेतली भेट! #Chandrapur #Chandrapurloksabha

Bhairav Diwase


चंद्रपूर:- वणी आर्णी चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी मनसे नेते राजु उंबरकर यांच्या निवासस्थानी व कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

मनसे नेते राजूभाऊ उंबरकर यांची सुधीर मुनगंटीवार यांनी दि. 03 एप्रिलला लक्ष्मी नगर येथील निवासस्थानी भेट घेतली असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तसेच मुनगंटीवार समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या भेटीदरम्यान उंबरकर परिवाराकडून मुनगंटीवार यांचे आदरतिथ्य करत तृप्ती राजु उंबरकर यांनी औक्षण केले तर मनसेच्या वतीने मुनगंटीवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती न देण्यात आल्याने नेमकी कोणत्या मुद्द्यांवर भेट होती. याबाबत अजून तरी अस्पष्टता आहे . मात्र नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना? यासह अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. दरम्यान, नागरिकांमध्ये अनेक चर्चा सुरू असून मनसेची भूमिका काय असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.