Top News

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाचा ना. सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठींबा #chandrapur #chandrapurloksabha

धनगर समाजाच्या प्रश्नांचा शासन स्तरावर पाठपुरावा करणार

धनगर समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने घेतली ना. मुनगंटीवारांची भेट

सुधीरभाऊ धनगर समाजाच्या प्रश्नाची जाण असणारा नेता:- डॉ. विकास महात्मे

चंद्रपूर:- चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाने चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पिरीपा (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांना समर्थन देऊन जाहीर पाठींबा दिला आहे. धनगर समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच त्यांची भेट घेऊन चर्चा केली. धनगर समाजाचे प्रश्न, समस्या, आरक्षणासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार, अशी ग्वाही यावेळी ना. मुनगंटीवार यांनी शिष्टमंडळाला दिली आहे.

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. या समाजाच्या अडचणी व समस्यां बाबत धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, प्रदेश अध्यक्ष अनंत बोनसोडे, प्रदेश सचिव ज्ञानेश्वर परदेशी यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण धनगर समाज बांधवांचा आपणास जाहीर पाठींबा देत असून आमच्या समाजाच्या अडचणीबाबत माहिती दिली. भटक्या जमाती की मध्ये घुसखोरी करून बोगस जात प्रमाणपत्र काढून नोकरी लाटणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करणे, चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील मेंढपाळांना शेळी-मेंढे चराईसाठी कुरण उपलब्ध मोफत पासेस मिळणे, शेळी-मेंढी करिता मोफत औषधी, लसीकरण, विमा कवच मिळणे, धनगर जमातीसाठी त्वरित घरकुल योजनाला अंमलबजावणी करणे, जिल्हा स्तरावर मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह उपलब्ध करून देणे, जिल्ह्याच्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह बांधणे, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे अश्या मागण्या त्यांनी निवेदनात केल्या आहेत. त्यावर आपण शासन दरबारी धनगर समाजाचे प्रश्न, अडचणी बाबत शासन स्तरावर पाठपुरावा करू, असे आश्वासन ना. मुनगंटीवार यांनी शिष्ट मंडळाला दिले.

ना. मुनगंटीवार यांनी धनगर समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावले

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना धनगर समाजाच्या प्रश्नांची जाणीव आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात धनगर समाजाचे अनेक प्रश्न देखील मार्गी लावले आहेत. देशाच्या संसदेत धनगर समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी असा नेता निवडून देणे काळाची गरज आहे. या लोकसभा निवडणुकीत त्यांना सर्वात जास्त मतांनी निवडून देण्यासाठी धनगर समाज बांधव त्यांच्या पाठीशी उभा राहील. सर्व समाज बांधवांनी त्यांचा प्रचार करण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार, पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने