वडेट्टीवारांचे तिकडे ‘विकासा'च्या बाता इकडे मात्र 'झकास' सोबत! #Chandrapur #chandrapurloksabha


विकासाबद्दलची वडेट्टीवारांची नक्की परिभाषा काय?

चंद्रपूर:- एक तरी 'विकास काम दाखवा' व पाच लाख रूपये मिळवा, असे आवाहन गडचिरोली लोकसभा क्षेत्रात भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या विरोधात प्रचार करतांना विरोधी पक्ष नेते विजय वडट्टीवार खुले आम करतांना दिसत आहे. नुकतेच त्यांनी चंद्रपूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या सभेला उपस्थिती दर्शविली. त्यावेळी चंद्रपूरच्या उमेदवाराने काय विकास केला? अशी टिका केली.


महत्वाचे म्हणजे चंद्रपूर भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी लोकप्रतिनिधी असलेल्या काँग्रेस उमेदवाराने विकासाची २१ कामे दाखवावी मी ३०० विकास कामे दाखवितो असे आवाहनचं केले आहे. या आवाहनला अजुनही धानोरकर यांनी उत्तर दिले नाही त्यामुळे मतदारांना 'खोटा शिक्का' समजून येत आहे. आत्ता चक्क विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे तिकडे 'विकास' सोबत व इकडे 'झकास' असल्याच्या मतदारांमध्ये चर्चा होत आहे.


राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो. नेत्यांनी काही बोलले तरी ते खोटेच आहे, एवढा अविश्वास आज नेत्यांवर जनतेचा झाला आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेस उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांचा प्रचार 'एकला चलो रे' असा सुरू आहे.


विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे शिवानी वडेट्टीवार यांना लोकसभेची तिकीट नाकारली म्हणुन 'जाम' नाराज आहेत, त्यामुळे त्यांचे समर्थक ही 'मनाने' काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करतांना दिसत नाही. वडेट्टीवार व त्यांच्या समर्थकांची नाराजी वरिष्ठांसमोर लपुन राहिलेली नाही. यापुर्वी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी धानोरकर यांच्या प्रचार सभेला उपस्थिती दर्शविली होती. त्यात त्यांनी ९ तारखेपासून मी चंद्रपूर ला काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ राहणार असुन त्यावेळी त्यांनी 'मी जिथे असतो विजय तिथे हमखास असतो.' असे सुचक विधान केले होते. त्यानंतर ते चंद्रपूरात दिसलेचं नाही. ते कुणासोबत आहेत. यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत्या. विजय वडेट्टीवार भाजपमध्ये जाणार अश्याही वावट्या या दरम्यान उठल्या होत्या. 


निवडणुकीला अवघे ४ दिवस असतांना काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या समोर पुन्हा एकदा चंद्रपूरला काँग्रेस उमेदवारांच्या सभेत उपस्थितीत दर्शवून फक्त वरिष्ठांचे समाधान तर केले नाही नां ! अश्या चर्चा आता काँग्रेस गोटात सुरू आहे. वडेट्टीवार हे विरोधी पक्ष नेते आहेत. अनुभवी राजकारणी आहेत. त्यांनी साडे नऊ वर्ष लोकप्रतिनिधी म्हणुन काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर व दिवंगत बाळू धानोकर यांनी केलेल्या विसर पडलेल्या विकासकामांची धानोरकर यांना आठवण करून द्यायला हवी.सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कामाला केलेल्या आवाहनाला प्रतिउत्तर द्यायला हवे. त्यामुळे वडेट्टीवार यांच्या विकास कामाची नक्की परिभाषा काय? यावर आता प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. त्याच कारणाने वडेट्टीवारांचे तिकडे ‘विकासा’च्या बाता इकडे मात्र 'झकास' सोबत! या चर्चेला सुरूवात झाली आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने