Top News

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी #chandrapur #chandrapurloksabha #Chandrapurpolice


तरुण मात्र पोलिस भरतीसाठी क्लासेस, ग्रंथालय व मैदानात!
चंद्रपूर:- राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र गृह विभागाने पोलिस भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. शारीरिक क्षमता चाचणीची तयारी करण्यासाठी जिल्ह्यातील क्रीडांगणे गर्दीने फुलली असल्याचे दिसून येत आहे. सकाळी अन् संध्याकाळी क्रीडांगणावर मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असून कुणी रनिंगसाठी तर कुणी गोळाफेकसाठी घाम गाळत असताना दिसून येत आहे.

चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडा स्टेडिअम, न्यू इंग्लिशचे क्रीडांगण, गडचिरोली रोडवरील वनविभागाच्या ऑफिसमागील क्रीडांगण तसेच ग्रामीण भागातीलही क्रीडांगणात तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात घाम गाळत असताना दिसून येत आहेत. यासोबतच जिल्ह्यातील सर्व क्लासेस, अभ्यासिका गर्दीने भरून दिसून येत आहेत. अनेकजण "आम्हाला यंदा पोलिस व्हायचंय" या उद्देशाने सकाळी मैदानावर घाम गाळत आहेत. तर त्यानंतर क्लासेस, ग्रंथालये गाठून तासनतास अभ्यास करत असल्याचे दिसून येत आहे.

#NarendraModi #PMNarendraModi #SudhirMungantiwar #pratibhadhanorkar #VijayWadettiwar #ShivaniWadettiwar #Subhashdhote   #SudhirMungantiwarvspratibhadhanorkar #chandrapurloksabha #chandrapurloksabha2024 #BJPvsNCP #ajitpawar #sharadpawar #ncp #eknathshinde #monsoon2024 #kishorjorgewar #shindefadnavisgovernment #devendrafadnavis #jitendraawhad #prafulpatel #chhaganbhujbal #maharashtrapolitics #Adharnewsnetwork #marathinewslive #marathinewsadharnewsnetwork #maharashtranewsadharnewsnetwork #marathibatmyanewsAdharnewsnetwork #live #ChhatrapatiSambhajinagar #MahavikasAghadiSabha #ThackerayGroup #Congress #NCP #BJP #chandrapur #gadchiroli #Nagpur #Maharashtra #Vidharbh #bhairavdiwase #murder #SupremeCourtHearing #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #vidhansabha #EknathShinde  #SanjayRaut #ShindeVSThackeray #SupremeCourtResult #EknathShinde #maharashtrapolitics #rainupdate

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने