अखेर सस्पेन्स संपला! India Squad for T20 World Cup 2024

Bhairav Diwase
टी-20 वर्ल्डकपसाठी भारताचा संघ जाहीर, 'या' खेळाडूंना संधी


टी-20 वर्ल्ड कप 2024 सुरू होण्यासाठी केवळ एक महिना राहिला आहे. त्याआधी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळने टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियामध्ये काही नवीन खेळाडूंनाही स्थान मिळाले आहे.

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ (India Squad for T20 World Cup 2024) :
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

टीम इंडियाचे टी-20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक - (T20 World Cup 2024 Schedule)

5 जून - टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड

9 जून - टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान

12 जून - टीम इंडिया विरुद्ध यूएएसए

15 जून - टीम इंडिया विरुद्ध कॅनडा