आधार न्यूज नेटवर्कच्या बातमीचा इम्पॅक्ट
विद्यार्थी संघटनेचे उपोषण मागे
राजुरा:- आधार न्यूज नेटवर्क मध्ये जिवती तालुक्यातील लोकांची व्यथा लक्षात घेऊन "स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा नंतरही जिवती तालुका लालपरीच्या प्रतीक्षेत" या मथड्याखाली वृत्त प्रकाशित करून "एका आठवड्यात बस सेवा सुरू न केल्यास विद्यार्थी संघटना हजारोच्या संख्येने प्रविन मेकर्तीवार आणि देविदास खंदारे यांच्या नेतृत्वात उपोषणाला बसणार असे प्रशासनाच्या लक्षात आणून दिले, वृत्त प्रकाशित होताच विद्यार्थी संघटनेचे प्रविन मेकर्तीवार आणि देविदास खंदारे उपोषणाला बसणार याची माहिती प्रशासनाला त्वरित मिळाली व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. लगेच क्षणाचाही विलंब न करता कार्यवाही ला सुरुवात केली आणि आजपासून जिवती साठी बस सुरू करण्यात आली. जिवती तालुक्यातील विद्यार्थी आणि नागरिकांनी प्रविन मेकर्तीवार, देविदास खंदारे, तसेच आधार न्युज नेटवर्क यांचे आभार मानले
बस चे वेळापत्रक
•राजुरा वरून भारी सकाळी 11:00 वाजता
•भारी वरून गडचांडुर दुपारी 1:30 वाजता
•गडचांदुर वरून शेणगाव मार्गे जिवती दुपारी 3:30 वाजता
आणि
•जिवती वरून शेणगाव मार्गे राजुरा सायंकाळी 5:15 वाजता