तलावात पोहायला गेलेल्या 2 चिमुकल्यांचा बुडून मृत्यू #chandrapur #Gondpipari

चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

गोंडपिपरी:- गोंडपिपरी येथील न्यायालयाच्या मागे तलावात मित्रांसोबत अंघोळीला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा तलावात बुडाल्याची घटना दि 7 मे ला मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.


सदर घटना ही रात्री आठ वाजता दरम्यान उघडकीस आली. माहिती मिळताच गावकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बुडालेल्या बालकांची शोधमोहीम हाती घेतली असता सकाळी 2 चिमुकल्यांचा मृतदेह हाती लागला.

गौरव विलास ठाकूर वय १४ वर्ष राहणार छत्रपती शिवाजी चौक, गोंडपिंपरी, शौर्य भास्कर पिंपळशेंडे वय १५ वर्ष रा. शिवाजी चौक गोंडपिंपरी अशी तलावात बुडालेल्या मुलांची नावे आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असल्याने व उन्हाचा पारा जास्त असल्याने मंगळवारी सकाळी 12 वाजता दरम्यान वार्डातीलच काही मुले फिरायसाठी गेल्यानंतर त्यांना तलावात पोहण्याचां मोह आवरला नाही. चिमुकले पोहण्यासाठी तलावात गेले तेथील काही मुले घरी परतले तर दोघे बुडाले. मात्र भीतीपोटी ईतर चिमुकल्यांनी ही घटना घरच्यांना सांगितली नाही. बेपत्ता मुलांच्या घरच्यांनी शोधाशोध केली असता माहिती काढली असता पोहायला गेलेले समजले. कुटुंबीयांनी तलावाकडे रात्री ८ वाजता दरम्यान धाव घेतली. तलावाच्या बाहेर कपडे आढळले असून कपड्यांची ओळख पटली.

घटनेची माहिती मिळताच गोंडपिंपरी चे ठाणेदार रमेश हत्तीगोटे पोलीस ताफ्यासह घटनास्थळावर हजर झाले मृतदेह शोधण्यासाठी पथकाला प्राचारण करण्यात आले आहे. स्थानिक मासेमारांच्या सहकार्याने शोध मोहीम सुरू केली. सकाळच्या सुमारास 2 चिमुकल्यांचा मृतदेह हाती लागला. घटनेमुळे गोंडपिपरीत शोककळा पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या