राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील अटकेत #chandrapur #acbchandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- गेल्या काही दिवसांपासून फरार असलेले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाचगणी येथून ताब्यात घेतले. त्यांना चंद्रपुरात आणल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली.


मंगळवारी सायंकाळी पाटील यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता १६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

'बियर शॉपी'च्या परवान्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणातील इतर आरोपी दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांना सोमवारी जामीन देण्यात आला, मात्र पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. यानंतर 'एसीबी'ने तपासाला गती दिली. संजय पाटीलला चंद्रपुरात आणण्यात आले व येथेच त्यांना अटक करण्यात आली.