चंद्रपूर जिल्ह्यात दुचाकी चा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू #chandrapur #ballarpur #accident

बल्लारपूर:- बल्लारपूर - कोठारी मार्गावर ११ मे शनिवारी सायंकाळी पाच वाजता दरम्यान हायवा दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघातात गोंडपिपरी तालुक्यातील लिखितवाडा येथील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
लिखितवाडा येथील प्रेमदास छत्रपती सरवर (२२) तारडा येथील मयूर नागोसे दोघेही बल्लारपूर येथील बॉटनिकल गार्डन पाहायला आले असता परत जाताना कोठारी पुलाजवळ हायवा व एमएच ३४ बीएल ४०३९ क्रमांक ची दुचाकीचा समोरासमोर धडक झाली.

धडक जोरदार असल्याने प्रेमदासचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेला मयूर नागोसे याला चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालय येथे उपचाराकरिता पाठविले. मात्र त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृतक प्रेमदास याच्या पश्चात आई-वडील दोन बहिणी असा बराच मोठा आप्त परिवार असून कुटुंबातील तो एकुलता एक मुलगा असल्याने गावात शोककळ पसरली आहे. पुढील तपास कोठारीचे ठाणेदार आशिष बोरकर करीत आहे.

'त्या' अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू

 बॉटनिकल गार्डन पाहून दुचाकीने गावाला जात असताना बल्लारशहा - कोठारी मार्गावर शनिवार दि. ११ मे रोजी रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान हायवा आणि दुचाकीचा अपघात झाला. अपघातात गोंडपिपरी तालुक्यातील लिखितवाडा येथील प्रेमदास छत्रपती सरवर (२२) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. दरम्यान, जखमी असलेला तारडा येथील महेश विश्वनाथ नागोसे (१८) याचा सुद्धा शनिवारी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या