गोष्ट प्रेमाची; प्रियकर आणि प्रेयसीची!
सिंदेवाही:- पोलीस स्टेशनला एका गुन्ह्याची नोंद झालेली आहे. आजकालचा युवा वर्ग हा एकदम फॅशन म्हणून फोनवर व कॉलेजात आपल्या तरुणवयात गर्लफ्रेंडचा वापर करत आहे. त्यातून जवळीकता साधून वेगवेगळ्या संभाषणातून निरनिराळे प्रकार उघडकीस येत आहेत. असाच एक प्रकरण सिंदेवाही तालुक्यात निदर्शनास येऊन कायद्याच्या चौकटीत सापडले आहेत.
त्या गुन्ह्यातील सविस्तर वृत्त असे कि, आरोपीचे व प्रेयशी मुलींचे एकमेंकावर प्रेम होते. त्या प्रेम संबधातूनच त्यांची जवळीकता वाढीस येऊन भेटिगाठी वाढत गेल्या. प्रेमाच्या मोहपाषात दोघेही आंधळे होऊन क्षणिक सुखाच्या नादात एकमेकांच्या संगनमताने शरीर सुख उपभोगत होते. त्याचाच विपरीत परिणाम हा काही दिवसाने प्रेयसी रुग्णालयात गेली असता तिच्या अंगलट आल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी संबधित डॉक्टरांनी वेळीच दखल घेत त्या व्यक्तीची तपासणी करून निदान लक्षात येताच त्यांनी त्या व्यक्तीची वयाची 18 वर्ष पूर्ण नसल्याने या घटनेला कायदेशीर वळण लागले. त्यामुळे प्रेम प्रकरणातील प्रियकर प्रेयशीला कायदेशीर चपराक मिळाली आहे. अशी चर्चा जनसामान्यात सुरु आहे.
सदर घटनेतील आरोपीला फिर्यादी हि अल्पवयीन असल्याचे माहित असून सुद्धा शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यावरून पो.स्टे.सिंदेवाही येथे अप.न.235/2024 कलम 376(2)(एन)भा.द.वि. सह कलम 4,6 बाल. लैं.अ.सं.अधि.2012 अन्वये गुन्हा नोंद झाला आहे. सदर गुन्ह्यांचा तपास ठाणेदार तुषार चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली API स्थूल पुढील तपास करीत आहेत.