Chandrapur News : दारू सोडण्यासाठी औषध प्यायल्याने 2 तरुणांचा मृत्यू #chandrapur #bhadrawati #death

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूचं व्यसन सोडण्याचं औषध घेतल्याने गुडगाव येथे राहणाऱ्या दोन तरुणांचा मृत्यू झालाय. तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. व्यसन सोडण्यासाठी घेतलेल्या औषधानेच जीव गेल्याने परिसरात खळबळ उडालीय.

सहयोग सदाशिव जीवतोडे (१९), प्रतीक घनश्याम दडमल (२६) राहणार गुळगाव, अशी मृतकांची नावे आहेत, तर सदाशिव पुंजाराम जीवतोडे (४५) व सोमेश्वर उद्धव वाकडे (३५) या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे चारी मद्यपी गुडगाव येथील असून मद्यपी वर्धा जिल्ह्यातील जाम जवळच्या शेडगाव येथे शेळके महाराजांकडे दारू सोडण्यासाठी गेले होते. महाराजांनी त्यांना दारू सोडण्याची औषध दिलं. त्यानंतर ते आपल्या गावी गुळगाव येथे परत आले. त्यानंतर या चौघांचीही प्रकृती बिघडली. त्यानंतर लगेच भद्रावती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. यामध्ये सहयोग आणि प्रतीक या दोघांचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला. इतर तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेचा तपास भद्रावती पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)