
चंद्रपूर:- किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ समन्वयक यांचे सूचनेनुसार व किशोर जी राय संपर्क प्रमुख यांचे मार्गदर्शनात नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर तसेच प्रतिमा ठाकूर महिला आघाडी जिल्हाप्रमुख व भरत गुप्ता महानगर प्रमुख चंद्रपूर यांचे नेतृत्वात विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र राज्य यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या बद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा चंद्रपुरात तीव्र निषेध करण्यात आला.
स्थानिक बाबूपेठ पोलीस चौकी समोरील शहिद हेमंत करकरे चौकात विजय वडेट्टीवार यांच्या निषेध करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख नितीन भाऊ मत्ते,बंडू भाऊ हजारे,महिला जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकुर, महानगर प्रमुख भरत गुप्ता,तालुका प्रमुख संतोष पारखी,दिपक कामतवार,माया ताई मेश्राम,वाणी सदालावार, सुनीता गोवर्धन,मंदा करहाले,श्रेयांश ठाकुर, राकेश बहुरीया,राजू डांगे,नयन जंगम,आदित्य यादव,राजू ऐटलावार व शिवसैनिकांची उपस्तिथी होती.