सास्ती-राजुरा मार्गावर अपघात; ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू chandrapur Rajura accident

Bhairav Diwase
राजुरा:- सास्ती-राजुरा मार्गावर जे. के. ट्रान्स्पोर्टचे अवजड वाहनाने (एमएच. 34 एवी 2559) सचिन पिपरे (वय 28, रा. बोर्डा) याच्या दुचाकी वाहनाला धडक दिली. यामध्ये उपचारादरम्यान सचिनचा मृत्यू झाला. घटनेनंतर वाहन चालक घटनस्थळावरून पसार झाला.

सास्ती-राजुरा मार्गावर नेहमीच अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यात अवजड वाहनाने सचिनच्या दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये सचिनच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने घटनास्थळावरून नागरिकांनी वेकोलि रुग्णवाहिकेने सचिनला प्राथमिक उपचारासाठी वेकोलि चिकित्सालय, धोपटाळा येथे दाखल केले. परंतु, सचिनची अवस्था गंभीर झाल्याने चिकित्सालयातून त्याला राजुरा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची गंभीर अवस्था पाहता जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे पाठविले.

तेथील उपचारानंतर नागपूर येथे उपचारासाठी नेताना भद्रावतीजवळ त्याची प्राणज्योत मावळली. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. सचिन हा घरचा कमावता व्यक्ती असल्याने परिवारावर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.