हॉटेल सितारा बार अँड रेस्टॉरंटच्या मालकावर प्राणघातक हल्ला #Rajura #chandrapur

Bhairav Diwase
0
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील वरुर रोड येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या हॉटेल सितारा बार अँड रेस्टॉरंट येथे काल रात्री दहा वाजताच्या सुमारास मालकावर प्राणघातक हल्ला झाला असून मालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

काल रात्री १० वाजताच्या सुमारास मद्य प्राशन करण्यासाठी आलेल्या इसमाने बिलावरून शुल्लक वादाची सुरवात झाली. यामुळे नशेत असलेल्या ग्राहकाने बार मध्ये नासधूस करून बार चालक नारायण मंथापुरवार व त्यांचा मुलगा वेंकटेश मंथापुरवार यांना मारहाण केली. यावेळी मुलगा व्यंकटेश याच्या डोक्यावर तीसहून अधिक दारूच्या बाटल्या फोडल्याने तो रक्तबंबाळ झाला असून चंद्रपूर येथील मेहरा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलल्या जात आहे. मालक गंभीर जखमी असून बिअर बारची तोडफोडीने बारचे मोठे नुकसान झाले आहे. सद्या राजुरा पोलीस प्रशासनाकडून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)