कोरपना:- काँग्रेसचे कार्यकर्ते अक्षय काकडे यांची मुलगी आश्वी अमृता अक्षय काकडे तिच्या पहिल्या वाढदिवसाचा सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या सोहळ्यात चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राच्या लोकप्रिय खासदार प्रतिभा बाळू धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभाताई अशोक जीवतोडे, जनता महाविद्यालय चंद्रपूर चे प्राचार्य डॉ. एम. सुभाष सर, नागराननी सुभाष मेकला यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
सर्व मान्यवरांनी कू. आश्वी ला शुभ आशीर्वाद दिले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व उपस्थित सर्व नातेवाईक व मित्रगण यांनी आश्वी ला शुभ आशीर्वाद दिल्याबद्दल अक्षय यांनी आंनद व ऋण व्यक्त करत या शुभेच्छांचा स्वीकार केला.