बल्लारपुर:- जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी शहरातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाजवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून जोरदार निदर्शने करीत या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात करण्यात आला.
मागील काही महिन्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहे. या हल्ल्यात निष्पाप नागरिक, भारतीय जवान शहीद होत आहेत. केंद्र सरकार हे हल्ले रोखण्यासाठी निष्फळ ठरल्याने केंद्र सरकार विरोधात देखील यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांच्या नेतृत्वात व उपजिल्हाप्रमुख सिक्किभाउ यादव,महिला आघाडीचच्या जिल्हा संघटिका कल्पनाताई गारगोटे,प्रमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात तालुका प्रमुख प्रकाश पाठक,शहर प्रमुख बाबा साहू, विसारपूर ग्रा.पं.सदस्य प्रदीप गेडाम,बाबी कालाशी,अरुण पाठाल,सतीश पाठणकर,सचिन अंबादे, सुधाकर पोपले,कैलाश मोडघरे,अमित पाझरे,अनिकेत बेलखोडे,सचिन उईके, गैरव नाडमवार,सोनू श्रीनिवास,पारस महाजनवार,युसुफ शेख,संजय वर्मा,अजय करूनकर, बादल केनकर,लककी रोहिदास,रोहित गलगट,रोहित सरोज,प्रशांत देशमुख, मीनाक्षी गलगट, ज्योती गाहलोत,रजनी बीरे, किरण झुनगरे,अनिता माझी,अंजली शिवबाशी,रीता बेन,सुनीता राय,नेहा मुदडा, वर्षा चव्हाण व आदी शिवसेना,युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला आघाडी पदाधिकारी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.