चंद्रपूर:- राजुरा व चंद्रपूर शहरातील 4 जुलैला घडलेल्या 2 घटनेने चंद्रपूर जिल्हा हादरला. राजुरा तालुक्यात 4 जुलै रोजी पहाटे 2:30 वाजताच्या सुमारास अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर मजुरी करणाऱ्या एका व्यक्तीची युवकांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तर दोन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर चंद्रपूर शहरातील आझाद बगीच्याजवळ असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये 4 जुलैला दुपारच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. अमन अंधेवार असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. या गोळीबारात अंधेवार यांच्या पाठीला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
पहिल्या घटनेत राजुरा तालुक्यात दिनांक 4 जुलै रोजी पहाटे 2:30 वाजताच्या सुमारास अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर मजुरी करणाऱ्या एका व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तर दोन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजुरा तालुक्यापासून 6 किमी अंतरावर असलेल्या धोपटाळा येथील नाल्यातून राजुरा येथील येवले नामक व्यक्तीच्या ट्रॅक्टरने रेती तस्करी होत होती. दरम्यान 3 जुलैच्या मध्यरात्री येवले ह्यांचा ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक करीत असताना धोपटाळा येथील काही युवकांनी ट्रॅक्टर अडविला. मजुर व युवकांची बाचाबाची झाली व ह्याचे पर्यावसान हाणामारीत होऊन ट्रॅक्टर वर मजुर म्हणून काम करणाऱ्या मजुराचा मृत्यू झाला. तर दोन मजुर जखमी झाले. मोहम्मद शहादत खान (52) असे मृतकाचे नाव आहे. जखमींमध्ये ट्रॅक्टर मालक देविदास येवले (47) व मजूर कैलास कुळसंगे (30) यांचा समावेश आहे. तर रोशन बावणे (28) बंडू कुकर्डे (40) हे हल्ल्यातून थोडक्यात बचावले.
तर दुसऱ्या घटनेत चंद्रपूर शहरातील आझाद बगीच्या जवळ असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये आज दुपारच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. अमन अंधेवार असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. या गोळीबारात अंधेवार यांच्या पाठीला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे हलविण्यात आले आहे. चंद्रपूर शहरातील आझाद बगीच्या जवळ असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये मनसेच्या कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांचे कार्यालय आहे. 4 जुलैला रोजी दुपारी दिड वाजताच्या सुमारास अंधेवार कार्यालयात येण्यासाठी रघुवंशी कॉम्प्लेक्सच्या लिफ्टजवळ आले. तिथे त्यांनी लिफ्टची बटन दाबली आणि लिफ्टचा दरवाजा उघडण्यापूर्वीच त्यांच्या मागून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. गोळी त्यांच्या पाठीला लागली. चंद्रपूरात प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे हलविण्यात आले आहे.