मुल:- मूल तालुक्यातील जूनासूर्ला, चांदापूर, विरई, फिस्कुटी, गडीसूर्ला या परीसरात गेल्या वर्षभरापासून वाधाचा धूमाकूळ सुरु आहे. गेल्या वर्षभरापासून वाघाने शेळ्या मेंढ्या व डुकरावर हल्ला करून ठार केले आहे.मेंढपाळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता पण आरडाओरडा केल्यामुळे मेंढपाळ हल्ल्यातून बचावले याबाबत वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ महासचिव संजय कन्नावार यांनी मुंबईतील पर्णकुटी बंगल्यावर भेट घेऊन निवेदन दिले.वनमंत्र्यांनी तातडीने वनाधिकारी यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश दिले आहे.
गेल्या वर्षी एका मेंढपाळावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करण्याच्या तयारीत होता,मात्र आरडाओरडा केल्याने वाघ पळून गेला.त्यात कुठलीही हानी पोहचली नाही, मात्र पुन्हा दि. २८/६/२०२४ रोजी त्याचीच पुनरावृत्ती घडली. मेंढपाळांनी आरडाओरडा केल्याने वाथ पळून गेला यापूर्वी वनविभागाने टॅप कॅमेरे लावून वाघाला प्रत्यक्षात बधीतले होते. मात्र अजून पर्यंत त्या वाघाचा बंदोवत्स करण्यात आलेला नाही. वनविभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
याबाबत राष्ट्रीय समाज पक्षाने अनेकदा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना संपर्क साधला मात्र थातूरमातूर चौकशी करून दुर्लक्ष केले.त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने याबाबतचे निवेदन देऊन त्या वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली.