बल्लारपूर:- लोहखनिज घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने मोपेडला दिलेल्या जोरदार धडकेत झालेल्या अपघातात पत्नी ट्रकखाली मृत निलिमा चिरडली रोहणकर गेल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाला. ही घटना बल्लारपूर शहरातील वर्दळीच्या बीटीएस चौकात शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. निलिमा देवराव रोहनकर (३८, रा. छोटा बाजार वॉर्ड, चंद्रपूर) असे मृत पत्नीचे नाव आहे. तर देवराव रोहनकर असे जखमी पतीचे नाव आहे. डोळ्यादेखतच पत्नीचा करुण अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
रोहनकर दाम्पत्य आपल्या मोपेडने (एमएच ३४ सीपी २४१७) गोंडपिपरीहून चंद्रपूरच्या दिशेने जात होते. बीटीएस चौकात लोहखनिज घेऊन घुग्गुसकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ३३ टी ३८३६ ने मोपेडला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत निलिमा रोहनकर रस्त्यावर पडल्या आणि ट्रकचे मागील चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचे पती देवराव हे बाजूला फेकले गेल्याने त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. अपघाताची माहिती होताच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान ट्रकचालक आपले वाहन सोडून घटनास्थळावरून फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी तातडीने धाव घेत वाहतूक सुरळीत केली. बल्लारपूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे पाठवला आहे. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

