
पोंभूर्णा:- तालुक्यातील बोर्डा बोरकर येथील एक वृद्ध नाल्यात उडी घेतली असल्याची घटना दि.२२ जुलै सोमवारला दुपारी बाराच्या दरम्यान उघडकीस आली. यासंबंधाने पोंभूर्णा पोलिसाने रेस्कू टीमच्या सहकार्याने शोध मोहीम राबविल्या गेले मात्र सोमवारला संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत वृद्धाच्या संबंधित कोणताच सुगावा लागला नाही. विनोद कुणघाडकर वय (५५) रा. बोर्डा बोरकर असे नाल्यात उडी घेतल्या इसमाचे नाव आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा बोरकर व बोर्डा झुल्लुरवार गावाच्या मधात असलेल्या नाल्यावर दि. २१ जुलै रविवारला रात्री नऊ वाजताच्या सुमारास बोर्डा बोरकर येथील ५५ वर्षीय इसमाने नाल्याच्या बाजुला असलेल्या एका झुडपाला कपडे लटकवून होते. सदर वृद्ध इसमाने पुलीयावरून उडी घेतली असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. नाल्याच्या बाजुला असलेल्या कपड्यांमध्ये जे आधार कार्ड मिळाले यावरून सदर इसम विनोद कुनघाडकर असल्याचे पटले. सदर घटनेची माहिती सोमवारला दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली.
सदर घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोंभूर्णा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोंभूर्णा पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्राथमिक तपास केला व रेस्कू टीमला बोलवले. व दुपारपासून सर्च मोहिम राबविण्यात आली मात्र सोमवारला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नाल्यात उडी घेतल्या इसमाचा शोध लागला नव्हता. मंगळवारला पुन्हा शोध कार्य सुरू करण्यात येणार असल्याचे ठाणेदार मनोहर कोरेटी यांनी माहिती दिली आहे.