
पोंभूर्णा :- तालुक्यात मागील तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे अंधारी नदीला पूर आला आहे. थेरगाव, वेळवा, जामखुर्द मार्ग बंद झाले आहेत. तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली आहे.काही घरात पाणी शिरले आहे. नदीकाठी असलेल्या गावांना मोठा फटका बसला आहे. शेकडो हेक्टर क्षेत्रातील शेती पाण्याखाली गेले असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अश्यात थेरगाव नदी काठावरील डांबर प्लॅन्ट मध्ये वाॅचमॅन म्हणून कामावर असलेले व डांबर प्लॅन्ट मध्ये अडकलेले दोघांना दि. २१ जुलै रविवारला मध्यरात्री नंतर साडे बारा वाजताच्या सुमारास तालूका प्रशासनाने एसडीआर टिमच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले आहे. अरुण माणिकचंद निमसरकर वय (६४)रा. देवाडा खुर्द, नारायण जिबलाजी जुनघरे वय (७२) रा. मारेगाव असे रेस्कू करून काढलेल्यांचे नाव आहे.
मागील तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे पोंभूर्णा तालुक्यातून वाहणाऱ्या अंधारी नदीला पूर आला आहे. थेरगाव-देवाडा खुर्द मार्ग बंद झाला आहे. रविवारला थेरगाव नदी काठावरील डांबर प्लॅन्ट मध्ये नदीच्या पुराचे पाणी शिरले. या डांबर प्लॅन्ट मध्ये काम करणारे दोघे वाॅचमॅन अडकले होते मात्र रविवारला संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत त्यांनी घरच्यांशी वा प्रशासनाशी कोणत्याही प्रकारे संपर्क केला नव्हती. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच तहसीलदार शिवाजी कदम व ठाणेदार मनोहर कोरेटी घटनास्थळी पोहोचून एसडीआर टिमला बोलवून त्या अडकलेल्या दोघांचे रेस्कू करण्यात आले. यात त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तालुक्यात पुरपरस्थिती असल्यामुळे सतर्कतेचा इशारा तहसीलदार यांनी दिला आहे.