पोंभूर्णा :- गोंडपिंपरी ते मुल मार्गाची एसटी बस पोंभूर्णा येथून मुल कडे जात असतांना दोन नाल्याच्या पुरामध्ये अडकली होती.बस मधील ड्रायव्हर, कंडक्टर व एक महिला पॅसेंजर सुखरूप बाहेर पडले. मात्र मागील 31 तासांपासून बस तिथेच अडकून पडली होती. शेवटी जामखुर्द कडील नाल्याचे पाणी ओसरल्यावर बस बाहेर निघाली.
गोंडपिंपरी ते मुल मार्गाची एसटी बस पोंभूर्णा येथून रविवारी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान मुल कडे जात असताना सुशी व जामखुर्द गावाच्या जवळ असलेल्या दोन्ही नाल्यावर पाणी वाढल्याने दोन नाल्याच्या मधात अडकली. पाण्याचा अंदाज पाहून ड्रायव्हर, कंडक्टर व एक पॅसेंजर सुखरूप बाहेर पडले. मात्र एसटी बस दोन नाल्यांच्या मधात अडकली होती. तब्बल 31 तास बस अडकूनच होती.सोमवारला साधारण तीन वाजताच्या दरम्यान जामखुर्द नाल्याचे पाणी कमी झाल्याने बस बाहेर काढण्यात आली.