सिंदेवाही:- दारू पिण्यास घरी पैसे का मागतो, या कारणावरून झालेल्या वादात मुलाने दगड फेकून मारल्याने वडिलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना वासेरा येथे सोमवारी दि. २२ जुलैला दुपारी उघडकीस आली. अशोक रामटेके (४५) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी मुलगा अमित रामटेके (२४) याला अटक केली आहे.
मृतकाची पत्नी अर्चना रामटेके यांच्या तक्रारीनुसार, मृतक पती अशोक रामटेके याने इतरांकडून घेतलेले पैसे परत करायचे आहे अशी मागणी केली. त्यामुळे 500 रुपये दिले. त्यातील 400 रुपये संबंधिताला परत करून पतीने स्वतःकडे 100 रुपये ठेवून घेतले. तेवढ्यात आरोपी मुलगा अमित हा घरी आला. तेव्हा वडिल व आरोपी अमित रामटेके यांच्या दोघात वाद झाला. लाथाबुक्क्याने मारून खाली पाडले आणि दगड फेकून मारल्याने वडील गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती पोलिस पाटील देवेंद्र तलांडे यांनी सिंदेवाहीचे ठाणेदार तुषार चव्हाण यांना दिली. पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पुढील तपास सुरू आहे.