Firing in Rajura City: राजुरा शहरात गोळीबार; एकाचा मृत्यू #rajura #murder

Bhairav Diwase
राजुरा:- राजुरा शहरातील पंचायत समिती रोडला असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र, ओम जनरल स्टोअर्स जवळ दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात आरोपीने गोळीबार करून हत्या केल्याची घटना आज दि. 23 जुलै ला रात्रौ 7:00 वाजताच्या सुमारास घडली. मृतकाचे नाव शिवज्योतसिंग देवल असे आहे.


प्राप्त माहितीनुसार मृतक शिवज्योतसिंग देवल 28 राहणार सोमानाथपुर वार्ड राजुरा हा आपल्या वडिलांना कर्नल चौक येथून भेटून आसीफाबाद रोड ने जात असताना त्यांच्या मागावर असलेल्या दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीने पाठलाग करीत होते. अचानक शिवज्योतसिंग देवल यांच्यावर हल्ला झाल्याने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी ओम जनरल स्टोअर्स येथे घुसला मात्र आरोपीने पाठलाग करुन गोळ्या झाडल्या यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस अधीक्षक यांनी भेट दिली असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.