सणासुदीचे दिवस असो बाहेर जाण्यासाठी बस किंवा ट्रेन असो रस्तेमार्गावर अनेक प्रवाशांची तुडूंब गर्दी दिसून येते. या प्रवासा दरम्यान आपल्यापैंकी अनेकजण दररोज बाहेर जाण्यासाठी बसचा प्रवास करत असतो.त्यामुळे प्रवाशांच्या असलेल्या तूफान गर्दीमधून बसमध्ये चढण्यासाठी कसरत करावी लागते.
मात्र काही महान प्रवाशी (passenger)असे असतात की जे प्रचंड गर्दीमधून क्षक्कल लढवून स्वत:साठी जागा मिळवतात. मात्र सध्या अशाच एका प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो गर्दीतून स्वत:साठी जागा पकडण्याच्या नादात त्याची क्षक्कल त्याच्याच अंगलटी आली आहे.सध्या या प्रवाशाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ एस्टी(Bus) स्थानकावरील असलेला वाटत आहे. त्यानंतर एक बस तिथे उभी असलेली दिसत आहे. बसच्या आजूबाजूला प्रवाशांची गर्दी दिसतेय. मात्र याच बसमध्ये चढण्यासाठी एक तरुण येतो आणि बसच्या खिडकीच्या मार्फत आत जाण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा तो तरुण बसजवळ येतो आणि त्याच्याजवळ असलेली बॅग खिडकीतून आत देता त्यानंतर खिडकीतून वर चढण्याचा प्रयत्न करतो मात्र बसची खिडकीसह तो जमिनीवर कोसळतो. संपूर्ण व्हिडिओ समोरील बसमधील प्रवाशांने कॅमेऱ्यात कैद केला आहे.