चंद्रपूर:- दि. 07/07/2024 रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्बच्या साह्याने हल्ला करण्यात आला होता. हल्ला करून आरोपी पळून गेले होते. सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन बल्लारशा जि. चंद्रपूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु हे तात्काळ घटनास्थळी पोहचून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, बल्लारशा पोलीस स्टेशन यांचे वेगवेगळे पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले. त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना जबलपूर राज्य मध्यप्रदेश येथून ताब्यात घेवून अटक करण्यात आली असुन, सदर आरोपी हे जबलपूर येथिल कुख्यात गैंग स्टार असून त्यांचेवर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच उर्वरित दोन आरोपींना स्थानिक पोलीस स्टेशन बल्लारशा यांचे मार्फतीने अटक करण्यात आले असुन पुढील तपास बल्लारशा पोलीस स्टेशन करित आहे.