चंद्रपूर:- दि. २३/०७/२०२३ रोजी राजूरा येथे पोलीस स्टेशन हद्दीतील सोमनाथ पूरा वार्ड येथे लल्ली शेरगील रा. सोमनाथ पुरा वार्ड राजूरा, याचेवर झालेल्या प्राण घातक हल्याच्या मनसुब्यातून आरोपी नामे लल्ली शेरगील व शगीर उर्फ मोनू कदिर शेख दोन्ही रा. राजूरा यांनी दि. २३/०७/२०२४ रोजी सायंकाळी ०७/०० वा. चे सुमारास पंचायतसमीती चौक राजूरा येथे मयत ईसम नामे शिवज्योत सिंह देवल याचे वर फायरिंग करून ठार मारून फरार झाले.
सदर घटनेचे गांभिर्य ओळखुन मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु हे तात्काळ घटनास्थळी पोहचुन स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, राजूरा पोलीस स्टेशन व उपविभाग राजूरा येथिल अधिकरी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले. त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना हत्यारासह ताब्यात घेण्यात आले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास राजूरा पोलीस स्टेशन करित आहे.