भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव करणभाऊ संजय देवतळे यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा... #HappyBirthday

Bhairav Diwase
शुभेच्छुक:- संयोजक - भाजपा सोशल मिडिया सेल वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र
युवकांना ऊर्जा देणारे युवा नेतृत्व म्हणजे करण देवतळे

 माजी मंत्री स्वर्गीय दादासाहेब देवतळे यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारण व समाजकारण क्षेत्रात मोठा दबाव होता. जिल्ह्यातील सर्व राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून तालुक्यातील सोईट हे गाव होते. १९८६ मध्ये स्व. दादासाहेब देवतळे यांच्या अचानक निधनाने काँग्रेस पक्षात नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यात काँगेस पक्षात मोठी राजकारणातील पोकळी निर्माण होईल असे सर्वांना वाटत होते. असे असतानाच दुसऱ्या पिढीतील त्यांचेच पुतणे संजय देवतळे यांचे पुनरागम झाले व त्यांनी वरोरा मतदार संघातील सर्व बाजू सांभाळून घेऊन सर्व जुन्या नव्या काँग्रेसवर व देवतळे कुटुंबावर प्रेम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना जोडून घेतले व वरोरा मतदारसंघावर तब्बल चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. तसेच मंत्री होऊन त्यांनी बाजू सांभाळली.यातूनच त्या मतदारसंघातील एक दबदबा ठेवला व देवतळे गट मजबूत केला मात्र पक्षाने तिकीट नाकारल्याने ते भाजपात गेले.

 भाजपा वाढविली दुर्दैवाने अचानक त्यांचे निधन झाल्याने पुन्हा पोकळी निर्माण झाली. पुढे काय होणार हा प्रश्न निर्माण झाला राजकीय समीकरणाची गणित बदलत गेले नवीन नवीन लोकं भाजपात आले थोडे चित्र बदलले मात्र देवतळे घराण्यावर प्रेम करणारे व त्यांच्यावर विश्वासात असणारे जुनी अनेक कार्यकर्ते पूर्ण मतदारसंघात कार्यरत असून वरोरा मतदार संघात भाजपचे अस्तित्व नव्हते तेथे मात्र स्वर्गीय संजय देवतळे यांनी आपल्या दहा वर्षाचा भाजपच्या सहवासात वरोरा हे भाजपमय करून टाकले हे विसरता येणार नाही. 

स्वर्गीय संजय देवतळे यांचे निधनानंतर देवतळे कुटुंबातील व्यक्तीने राजकारणात सक्रिय भाग घ्यावा म्हणून देवतळे चाहत्यावर्गांनी आग्रह केला व करण देवतळे यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सेवा करणे सुरू केले. राजकारणात काम करीत असताना युवकांना सोबत घेणे आज काळाची गरज असल्याने ती संधी साधून करण देवतळे यांनी भाजप पक्षातील व बाहेरील पक्षातील अनेक युवा वर्ग आपल्याकडे आकर्षित केले व त्यांच्याशी जोडून घेतले त्यांनी युवा मोर्चाच्या नावाने एक युवा संघटना सुद्धा निर्माण करून कार्य सुरू केले. मोठा युवा गट त्यांच्या पाठीशी असून करण देवतळे हे विद्याविभूषित असून व्यवसायाने इंजिनियर आहे. त्यांच्या वडिलांचे म्हणजे स्वर्गीय संजय देवतळे तसेच श्रीमती श्वेताताई देवतळे यांचे संस्कार त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे संजय देवतळे यांच्यावर प्रेम करणारा चहाता वर्ग अजूनही संजय देवतळे यांच्या रूपाने करण देवतळे यांच्याकडे बघितले जाते. करण देवतळे यांनी सामाजिक क्षेत्रातील अनेक उपक्रम राबवले त्यात प्रामुख्याने रक्तदान शिबिर, क्रीडाशिबिर, स्पर्धा परीक्षा, गरिबांना मदत करणे व कुठेही बोलवा तिथे उपस्थित राहणे हे त्यांचे एक वैशिष्ट्य मानले जाते. देवतळे घराणे कितीही श्रीमंत असले तरी देवतळे घराण्याचा सामान्य राहणीमानाचा आदर्श आजही करण देवतळे जोपासत असल्याचा गुण दिसून येते. त्यामुळे त्यांचे नेतृत्व वाखाण्यासारखे आहेत.

भाजपामध्ये सुद्धा राजकीय नेत्यांनी मोठ्या पदावर त्याला भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव म्हणून स्थान दिले त्यांचे वडील गेले तरी मात्र त्यांच्या पाठीशी माननीय मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यासारखे दिग्गज नेते त्यांच्या पाठीशी आहे तसेच इतर पक्षातील नेते, कार्यकर्ते सुद्धा जिल्ह्यातील असो की राज्यातील असो या मोठ्या नेत्यांच्या सुद्धा शुभेच्छा करण देवतळे यांच्या पाठीशी असल्याचे सदैव दिसून येते. त्याचप्रमाणे आजही संजय देवतळे यांचे कट्टर समर्थक सुद्धा करणच्या पाठीशी असून देवतळे कुटुंब एकत्र आल्याने करण देवतळे यांच्या भविष्याबद्दल प्रत्येक देवतळे समर्थक भविष्यासाठी आशावादी आहे.

 आज यांचा वाढदिवस असून त्यांच्या भावी जीवनासाठी देवतळे मित्र परिवाराकडून अभिष्टचिंतन सोहळा चे आज आयोजन केले आहे. सदर कार्यक्रम मित्रपरिवार च्या वतीने घेण्यात आला असून सर्वच पक्षातील नेत्यांची उपस्थिती आजच्या कार्यक्रमात लाभणार असल्याचे समजते व त्यांच्या भावी व राजकीय व सामाजिक प्रवासासाठी करण देवतळे यांना शुभेच्छा देणार आहे हे मात्र निश्चित. आमच्याकडून सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....