माओवाद्यांचा स्फोटाचा प्रयत्न फसला, दोन जवान जखमी #gadchirolipolice #gadchiroli #IED

Bhairav Diwase
0
गडचिरोली:- जिल्ह्यातील धोडराज येथील अभियानावरून परत येत असलेल्या C60 जवानांवर माओवाद्यांनी IED स्फोटाचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. सुदैवाने या स्‍फोटामध्ये जवान बचावले असून दोघे किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

C60 चे जवान रस्त्यावर शोध अभियान करत असताना धोडराज-भामरागड पुलाजवळ माओवाद्यांनी लोखंडी क्लेमोरने हा स्फोट घडवून आणला. यात दोन जवानांच्या हाताला किरकोळ जखमा झाल्या आहेत. मात्र, जवानांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. पुढील अनर्थ टळला. आता या परिसरात पुढील शोध मोहीम सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)