बल्लारपूर शहरात गोळीबार; गोळीबारात 1 जखमी #chandrapur #ballarpur #firing

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्समधे मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच बल्लारपूर येथे गोळीबाराची घटना घडली असून त्यात एक जण जखमी झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसांत गोळीबाराची ही दुसरी घटना असून चंद्रपूर जिल्हा हादरला आहे.बल्लारपूर शहरातील गांधी चौक परिसरातील मालू कापड दुकानात रविवारी भरदिवसा अज्ञात तरुणाने गोळीबार केला. तसेच दुकानात पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला आहे. अज्ञाताने लागोपाठ दोन गोळ्या झाडल्या, त्यातील एक गोळी दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पायाला लागली. कार्तिक साखरकर असे पीडितेचे नाव आहे. जखमी कार्तिकला चंद्रपूरच्या रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. त्याचबरोबर आरोपी सापडत नाही तोपर्यंत शहरातील दुकाने बंद ठेवण्याचा इशारा बल्लारपूर व्यापारी मंडळाने दिला आहे.घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू व टिम घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा सुरू आहे.टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)