Dharmaveer 2 : 'ज्याच्या घरातली लक्ष्मी दुःखी, त्याची बरबादी नक्की,' 'धर्मवीर-2' सिनेमाचा पहिली टीझर रिलीज

Bhairav Diwase
मुंबई:- प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर 2' चित्रपटाची गेल्या काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. आता टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलेला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर क्रांती दिनाच्या दिवशी अर्थात 9 ऑगस्टला रिलीज होणार आहे.
मराठी टीझर 


धमाकेदार टीझरमध्ये प्रेक्षकांना धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या चित्रपटातील "ज्याच्या घरातली लक्ष्मी दुःखी, त्याची बरबादी नक्की" या दमदार संवादाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या धडाकेबाज टीझरमुळे आता प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता आहे.
हिंदी टीझर 


टीझरमध्ये प्रेक्षकांना स्वर्गीय आनंद दिघे यांचा आक्रमकता दिसत आहे. अंगावर काटा येणाऱ्या ह्या टीझरमध्ये प्रेक्षकांना हिंदुत्त्वाची झलक पाहायला मिळत आहे. चित्रपटामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका दिग्दर्शक आणि अभिनेता प्रसाद ओकने साकारली आहे. चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई,उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनीच निभावली असून कॅमेराम न म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिले आहे.

काही दिवसांपूर्वीच 'धर्मवीर 2' चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले होते. 'धर्मवीर २'च्या पोस्टरवर साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट असा उल्लेख करण्यात आला आहे. धर्मवीर चित्रपटात दिघे साहेबांचे जीवनचरित्र दाखवल्यानंतर आता 'धर्मवीर
2' मध्ये हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार असून याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता आहे. 'धर्मवीर' चित्रपट थिएटरमध्ये फक्त मराठीमध्येच रिलीज झाला होता. पण आता 'धर्मवीर 2' चित्रपटाचा सिक्वेल मराठीसह हिंदी भाषेतही रिलीज होणार आहे.